पॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत?

 थ्री फेज पॉवर पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षिततेसाठी व कार्यक्षमतेसाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरला खालील भाग जोडलेले असतात.

  1. पॉवर ट्रान्सफॉर्मर टॅंक (Transformer Tank)
  2. बुशिंग (Bushing)
  3. टॅप चेंजर (Tap changer)
  4. काँझरव्हेटर (Conservator)
  5. ब्रिदर (Breeder)
  6. एक्सप्लोजन व्हेंट (Explosion Vent)
  7. बुकॉल्झ रिले (Buchholz Relay)
  8. टेंप्रेचर गेज (Temperature Gauge)
  9. पॉवर ट्रान्सफॉर्मर रेडिएटर (Radiators)
  10. पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑईल (Transformer Oil)

ह्या सर्व भागांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

1) पॉवर ट्रान्सफॉर्मर टॅंक (Transformer Tank)

पॉवर ट्रान्सफॉर्मर टॅंक | पॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग

ट्रान्सफॉर्मरचा  टँक लोखंडी पत्र्या पासून बनवलेला असतो . त्यात ट्रान्सफॉर्मर ऑईल भरुन त्या ऑईलमध्ये ट्रान्सफॉर्मर (कोअर व वाईडींग) बुडवून ठेवलेला असतो. मोठ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरसाठी कुलींग सिस्टम अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा टॅंक सरळ पत्र्यापासून न बनवता नागमोडी वळणाच्या पत्र्यापासून बनवलेली असते कारण नागमोडी पत्रा वापरल्यामुळे कमी जागेतच टॅकचे पृष्ठफळ वाढते आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये निर्माण झालेल्या उष्णतेचे उत्सर्जन लवकर होऊन ट्रान्सफॉर्मर थंड राहण्यासवमदात होते

2) बुशिंग (Bushing)

पॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग | बुशिंग

ट्रान्सफॉर्मर मधील L.T. व H.T. वाईडींगचे टोके काढलेले असतात. त्यास सप्लाय देण्यासाठी अथवा सप्लाय घेण्यासाठी बुशीग बसवलेले असतात. ह्या बुशींग मध्ये एक कंडक्टर असतो. त्या कंडक्टर भोवती सर्व बाजूनी इन्सुलेशन चढवलेले असते. साधारणपणे त्या इन्सुलेशनसाठी चिनीमाती किंवा काच वापरलेले असते.अशा इन्सुलेशनच्या अनेक शेडस् कंडक्टर भोवती देवून कंडक्टरचे शेवटचे टोक खुले ठेवलेले असते. त्या टोकावर नट बसवून लाईन कंडक्टर जोडण्याची व्यवस्था केलेली असते.

3) टॅप चेंजर (Tap changer)

पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाईंडींगला वेगवेगळ्या व्होल्टेजसाठी टॅपींग काढलेल्या असतात. ह्या टॅपिंगसची जोडणी एका रोटरी स्विचला केलेली असते. अशा स्विचला टॅप चेंजर । असे म्हणतात. हा स्विच हाताने अथवा मोटारच्या साह्याने चालवला (ऑपरेट केला) जातो. एखादेवेळी पॉवर ट्रान्सफॉर्मर वरील लोड वाढल्यास, त्याचे आवुटपूट व्होल्टेज कमी हाते. अशावेळी टॅप चेंजरच्या साह्याने सेकंडरीच्या टॅपींग बदलून व्होल्टेज स्थीर ठेवण्यासाठी टॅप चेंजरचा उपयोग होतो.

4) काँझरव्हेटर (Conservator)

पॉवर ट्रान्सफॉर्मर टॅंक च्या वरच्या बाजूस एका पाईपच्या साह्याने लांब गोलाकार टाकी जोडलेली असते. त्यास काँझरव्हेटर किंवा एक्सपेशन टॅंक असे म्हणतात. काँझरव्हेटर मध्ये अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त पातळी पर्यंत पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑईल भरलेले असते. ऑईलची पातळी पाहण्यासाठी काँझरव्हेटरला ऑईल लेव्हल इंडीकेटर बसवलेला असतो.

ट्रान्सफॉर्मर कार्य करीत असतांना उष्णतेने गरम झालेले ऑईल हलके होऊन वर येते आणि तसेच त्या उष्णतेमुळे गॅसेस निर्माण होतात. ते गॅसेस सामावण्यासाठी काहीतरी जागा रहावी म्हणून काँझरव्हेटर मधील ऑईलची पातळी अपेिक्षा जास्त ठेवलेली असते. जर पुर्ण काँझरव्हेटर भरुन ऑईलची पातळी ठेवली तर उष्णतेने निर्माण झालेल्या गॅसमुळे आंतरीक दाब वाढून टाकी फुटुन जाण्याची भिती असते.

5) ब्रिदर (Breeder)

काँझरव्हेटरच्या वरच्या बाजूस पाईपच्या साह्याने ब्रिदर जोडलेला असतो. ब्रिदर हा दंडगोलाकृती पाईप असतो. त्याचे खालचे टोक उघडे असते. त्यामध्ये वेगवेगळ्या चेंबरमध्ये सिलीका जैल व कॅलशियम क्लोराईड भरलेले असते. सिलीका जैल पूर्णपणे कोरडा असताना त्याचा रंग निळा असतो. आणि त्यात पाण्याचा अंश मिसळला गेल्यास त्याचा रंग पांढरा होतो. ट्रान्सफॉर्मर कार्य करीत असतांना, पॉवर ट्रान्सफॉर्मर टँक मधील ऑईल उष्णतेने प्रसरन पावते व थंडीमुळे आंकुचण होते. म्हणून जेंव्हा पॉवर ट्रान्सफॉर्मर मधील उष्णतेने ऑईल गरम होते तेंव्हा ते प्रसरण पाऊन गॅसेस निर्माण होतात. हे गॅसेस बाहेर निघून जाणे आवश्यक असतात. आणि ऑईल जेंव्हा थंड होते तेंव्हा ऑईल आंकुचण पावल्यामुळे हवेची पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरून काढणे आवश्यक असते. म्हणजे थोडक्यात यास असे म्हणता येईल की, ट्रान्सफॉर्मर कार्य करीत असतांना त्यास श्वासोश्वास आवश्यक असतो. हे कार्य ब्रिदर करीत असतो. म्हणून ब्रिदरला ट्रान्सफॉर्मरचे हृदय असे म्हटले जाते.

जेंव्हा टॅकमध्ये गॅसेस निर्माण होतात तेंव्हा, ते गॅसेस काँझरव्हेटर मधून ब्रिदरवाटे बाहेर पडतात. त्यावेळी काँझरव्हेटर मध्ये पोकळी निर्माण होते आणि बाहेरील हवेचा दाब वाढतो म्हणून बाहेरील हवा ब्रिदर मध्ये येते. ब्रिदरमध्ये असलेल्या सिलीका जैल व कॅलशियम क्लोराईड मुळे हवेतील बाष्प शोषून घेतले जाते. आणि बाष्प विरहीत शुध्द हवा काँझरव्हेटरला मिळून निर्माण झालेली पोकळी भरुन निघते.

थोडक्यात ब्रिदरचे मुख्य कार्य म्हणजे बाष्प विरहीत व ऑक्सिजन विरहीत शुध्द हवा काँझरव्हेटरला पुरवणे हे होय. ऑईल मध्ये बाष्प मिसळले गेल्यास त्या ऑईलची डायइलेक्ट्रीक कमी होते. आणि ऑक्सिजन मिसळून काही कारणास्तव स्पार्कीग झाल्यास ऑक्सिडेशनची क्रिया होऊन ऑइलाचे गोळेगोळे होतात. असे ऑईल वापरण्यास योग्य नसते. म्हणून ब्रिदर मध्ये आणखी एखादा रासायनिक पदार्थ ठेवून हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याची व्यवस्था केलेली असते.

6) एक्सप्लोजन व्हेंट (Explosion Vent)

पॉवर ट्रान्सफॉर्मर टँकच्या वरच्या बाजूस काँझरव्हेटरच्या शेजारी एक वाकडा पाईप जोडलेला असतो. त्यास एक्सप्लोजन व्हेंट किंवा इमरजंशी प्रेशर रिलीज असे म्हणतात. त्याच्या पुढच्या टोकाला एक पातळ पडदा लावलेला असतो. एखादेवेळी ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट, ओव्हर लोड अथवा अन्य प्रकारचा दोष होऊन जास्तीची उष्णता निर्माण झाल्यास, जास्त प्रमाणात गॅसेस निर्माण होऊन जास्तीच्या दाबामुळे व्हेंटवरील पडदा फाटतो आणि सर्व गॅसेस बाहेर निघून जातात. म्हणून स्फोट होण्यापासून ट्रान्सफॉर्मर सुरक्षित राहतो.

7) बुकॉल्झ रिले (Buchholz Relay)

 पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेसाठी हा आणखी एक घटक आहे. हा रिले ट्रान्सफॉर्मर टँक व काँझरव्हेटर यांच्या मध्ये पाईपच्या साह्याने जोडलेला असतो. ह्या रिले मध्ये आकृती 21.23 मध्ये दाखवल्या प्रमाणे ऑइलावर तरंगणारे दोन 2 चेंडू असतात. ह्या चेंडू खाली मक्यूरी स्विच असतात. साधारण स्थितीत दोन्ही स्विचचे कॉन्टॅक्ट ओपन असतात. वरच्या काँटॅक्टशी बेलचे सर्किट जोडलेले असते. बेलला बॅटरी मार्फत निगेटिव्ह टोके जोडलेले असते व पॉझिटिव्ह टोक स्विच मार्फत जोडलेले असते. खालच्या काँटॅक्टला ट्रिप सर्किट जोडलेले असते.

ट्रान्सफॉर्मर कार्य करीत असताना जर, त्यामध्ये किरकोळ स्वरुपाचा दोष झाल्यास ऑईल गरम होऊन गॅसेस मुळे आंतरिक दाब वाढतो अशावेळी वरचा चेडू खाली ढकलला जातो के व बेलचे सर्किट पूर्ण होते आणि बेल वाजून धोक्याची सूचना मिळते. दोष गंभीर स्वरुपाचा (शॉर्ट सर्किट, ओव्हरलोड, अर्थ फॉल्ट) दोष झाला तर, जास्त प्रमाणात आंतरीक दाब वाढून खालचा चेंडू पुढे ढकलला जातो. त्यामुळे त्याच्या शेजारचे काँटँक्ट जोडून ट्रिप सर्किट ऑन होते. आणि ट्रान्सफॉर्मर सप्लाय पासून अलग होतो. अशा प्रकारे हा रिले कार्य करुन ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण करतो.

8) टेंप्रेचर गेज (Temperature Gauge)

टैकच्या वरच्या बाजूस ट्रान्सफॉर्मरचे तापमान पाहण्यासाठी जोडलेल्या मीटरला टेप्रेचर गेज असे म्हणतात. ह्या मीटरमुळे तापमान वाढल्यास अलाराम वाजून किंवा दिवा पेटून सुचना मिळते.

9) पॉवर ट्रान्सफॉर्मर रेडिएटर (Radiators)

ट्रान्सफॉर्मर रेडिएटर हा पॉवर पॉवर ट्रान्सफॉर्मरचा मुख्य भाग आहे. जे पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यास मदत करते. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे पॉवर ट्रान्सफॉर्मर रेडिएटर 2 ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर टाकेला जोडलेले आहे. रेडिएटर पॉवर ट्रान्सफॉर्मर 2 ठिकाणी पाइपिंगद्वारे ट्रान्सफॉर्मर टॅंक च्या  वरच्या आणि खालच्या टोकाशी जोडलेला असतो. प्रत्येक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आवश्यकतेनुसार रेडिएटर्स असतात.

जेव्हा ट्रान्सफॉर्मर सेवेत असेल तेव्हा ट्रान्सफॉर्मर टॅंक मधील गरम ऑइल हलके होते आणि वरच्या बाजूस जाते. हे गरम ऑइल लवकर थंड होणे गेरजेचे असते . गरम  ऑइल चे  शीतकरण पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या रेडिएटर्सद्वारे केले जाते. गरम ऑइल रेडिएटरच्या वरील पाईपमधून रेडिएटरमध्ये जाते जिथून ते रेडिएटरच्या वेगवेगळ्या ब्लेडमध्ये विभाजित होते. बहुतेक रेडिएटर ब्लेड बाहेरील हवेच्या संपर्कात असतात. यामुळे, रेडिएटरच्या ब्लेडमध्ये पोचलेले गरम ऑइल ब्लेडमध्येच पटकन थंड होते. हे थंड झालेले  ऑइल जड होते आणि खाली जाते. हे थंड झालेले ऑइल ट्रान्सफॉर्मर रेडिएटरच्या खाली पाईपद्वारे पुन्हा ट्रान्सफॉर्मर टॅंक च्या  तळाशी प्रवेश करते. ही क्रिया सतत चालू राहते. अशा प्रकारे रेडिएटर्सच्या मदतीने पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवला जातो.

10) पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑईल (Transformer Oil)

हे एक खनीज ऑइल आहे. परंतु बाजारात ट्रान्सफॉर्मर ऑईल ह्या नावानेच प्रचलीत आहे. हे ऑईल चांगल्या प्रकारचा द्रव इन्सुलेटर आहे. बाष्पविरहीत आईलची

डायइलेक्ट्रीक स्ट्रेंथ 30 ते 40 के.व्ही. / मि.मी. असते. असे ऑईल  ट्रान्सफॉर्मर टैँकमध्ये भरुन त्यात वाईंडींग आणि कोअर ठेवलेला असतो. पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवणे व वाईंडींग आणि कोअर यामध्ये इन्सुलेटरचे कार्य करणे हे दोन महत्त्वाचे कार्य आईलचे असते.

हे ही वाचा

Rate this post

आपला अभिप्राय नोंदवा

%d bloggers like this: